अभिषेक बच्चनने यापूर्वी ऍक्शन आणि रोमॅंटिक हिरोचे रोल साकारले आहेत. पण बऱ्याच मोठ्या काळापासून तो कोठेही दिसला नव्हता. त्याच्या करिअरवरच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले होते. त्याने मात्र या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचेच धोरण कायम ठेवले होते. आता तो सिल्व्हर स्क्रीनवर भ्रष्ट राजकीय नेत्याच्या रोलमध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram
“दसवी’ या आगामी सिनेमामध्ये अभिषेक बच्चन एका अशिक्षित आणि भ्रष्टाचारी नेत्याच्या रोलमध्ये दिसणार आहे. दिनेश विजान निर्मिती करत असलेल्या या सिनेमामध्ये यामी गौतम आणि निमरत कौर या देखील असणार आहेत. अभिषेक बच्चनने यावर्षी वेबसिरीजमध्येही काम करायला सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या “इन टू द शॅडोज” या वेबसिरीजमध्ये तो दिसला होता. आता “ल्युडो” या नेटफ्लिक्सवरच्या आणखी एका वेबसिरीजमध्येही तो दिसणार आहे. त्याची तयारी सध्या तो जोरात करतो आहे.
View this post on Instagram
थिएटरवर रिलीज् होणाऱ्या सिनेमापेक्षा वेबसिरीजला अधिक स्वातंत्र्य मिळते. ते त्याला अधिक भावते असे त्याने मध्यंतरी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते. याशिवाय बिग बुलफया आणखी एका सिनेमामध्येही तो दिसणार आहे.
View this post on Instagram