पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील वाहन चोरी सत्र कायम असून त्यामध्ये रोज भरच पडत आहे. शहराच्या भोसरी, सांगवी परिसरातून तीन दुचाकी तर वाकडमधून एक रिक्षा चोरीस गेल्याची नोंद शनिवारी संबंधित पोलीस ठाण्यात झाली आहे.
वाहन चोरीच्या पहिल्या घटनेत धनंजय बाबुराव बुक्तरे (वय 24, रा. पांडवनगर कॉलनी, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी धनंजय यांची मैत्रीण अक्षरा शेरके यांची दुचाकी 12 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा ते सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लांडेवाडी भोसरी येथील ऍम्फीनॉल कंपनीसमोरून चोरून नेली.
वाहन चोरीच्या दुसऱ्या घटनेत मनोज दशरथ निवळकर (वय 54, रा. महेशनगर, पिंपरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निवळकर यांची दुचाकी कासारवाडी येथील जेआरडी टाटा उड्डाणपुलाखालून चोरून नेली.
वाहन चोरीच्या तिसऱ्या घटनेत अभिजित दशरथ धावणे (वय 24, रा. भैरवनाथ नगर, पिंपळे गुरव) यांची दुचाकी शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास चोरीस गेल्याचे उघडकीस आले. त्यांनी सांगवी पोलिसांत फिर्याद दिली आहे. वाहन चोरीच्या चौथ्या घटनेत सुनील मंजूनाथ लवटे (वय 30, रा. श्रीनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.