मंचर -करोनाच्या महामारीत शासकीय उपजिल्हा रुग्णालय मंचर आणि कोविड सेंटर अवसरी खुर्द येथे आंबेगाव तालुक्यातील 93 खासगी डॉक्टर शासकीय आरोग्य यंत्रणेबरोबर सज्ज झाले आहेत, अशी माहिती वैद्यकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
तालुक्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी कोविड सेंटरमध्ये आपली सेवा देण्याची तयारी केली आहे. तशी संमती आरोग्य यंत्रणेला यापूर्वीच दिलेली आहे.
सुरवातीच्या तीन महिन्यांच्या करोनाच्या काळात वैद्यकीय व्यावसायिकांनी उपजिल्हा रुग्णालयात फ्लू ओपीडीचे काम केले होते. तालुक्यातील सहा फिजिशियन गेल्या दोन महिन्यांपासून आपली तज्ञ सेवा याठिकाणी देत आहेत.