नगर – जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील पाण्याचे 1879 नमुने तपासले.त्यामध्ये 76 गावांतील 86 नमुने दूषित आढळून आले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रयोगशाळा व वरिष्ठ भूवैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण यांच्यामाध्यमातून मागील महिनन्यात पाण्याचे नमूने तपासण्यात आले. यामध्ये 86 नमुने दुषित असल्याचा अहवाल आला आहे.
दर महिन्याला जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पाणीनमुने तपासले जातात. यावर्षात मागील महिनाअखेरपर्यंत 19 हजार 77 नमुने तपासण्यात आले. त्यातील 1062 नमुने दूषित असल्याचा अहवाल आला आहे. नगर तालुक्यात सर्वाधिक नमूने दूषित आढळून आले. त्याखालोखाल संगमनेर तालुक्याचा क्रमांक लागतो. श्रीगोंदे तालुक्यातील पाण्याचे 162 नमुने तपासण्यात आले. त्यातील एकही नमूना दूषित आढळून आला आहे.
दूषीत पाणी आलेली गावे-
पारनेर ः राळेगण थेरपाळ, कोहकडी, रांजणगाव, कारेगाव, अकोले ः शेरणखेल नगर-चास, बारादरी, मेहेकरी, भातोडी, पारगाव, पारेवाडी, केकती, बाराबाभळी, वडारवाडी, वैद्य कॉलनी, बदडगाव, हिंगणगाव, संगमनेर-निमगाव बुद्रुक, निमज, शिरापूर, वाघापूर, संगमनेर खुर्द, रायतेवाडी, कौठे मलकापूर, पळस खेडे, घुलेवाडी. शेवगाव -कांबी, एरंडगाव समसूद, मुंगी. पाथर्डी-टाकळीमानूर, पारेवाडी, भालगाव, जवखेडे खालसा राहुरी ः माहेगाव बैरागीबाबा जामखेड ःसारोळा, काटेवाडी, कोपरगाव ः कारवाडी, कोळगाव, थडी, डाऊच बुद्रुक, कर्जत-बजरंगवाडी नेवासे ः पाथरवाला, नजीक चिंचोली, वाकडी राहाता-कोऱ्हाळे, रामपूरवाडी श्रीरामपूर ः मालुंजे, खोकर