सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 85 नागरिकांना गुरुवारी घरी सोडण्यात आले असून, 355 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील 18, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 29, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 16, वाईतील नऊ, खंडाळ्यातील एक, रायगावमधील पाच, पानमळेवाडीतील 118, महाबळेश्वर, पाटणमधील प्रत्येकी दहा, दहिवडीतील 17, खावलीतील 40, म्हसवडमधील 15, पिंपोडे येथील चार व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 73, असे एकूण 355 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
करोनाची सद्य स्थिती
घेतलेले एकूण नमुने – 262238
एकूण बाधित – 53197
घरी सोडण्यात आलेले – 50174
मृत्यू – 1756
उपचारार्थ रुग्ण – 1267