पुणे – मंकी हिल ते कर्जत रेल्वेमार्गावर पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वे वेळापत्रकात दि.1 ते 30 नोव्हेंबरपर्यंत बदल करण्यात आला आहे. यामध्ये काही गाड्यांचे मार्ग अंशत: बदलण्यात आले आहेत, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या आठ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर दोन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. तर सुमारे दहा गाड्यांचे प्रारंभ आणि समाप्तीचे स्थानक बदलण्यात आले आहे. यामध्ये 12126 पुणे-मुंबई, 12125 (प्रगती एक्स्प्रेस) मुंबई-पुणे, 07617 नांदेड-पनवेल साप्ताहिक विशेष, 51027-मुंबई-पंढरपूर, 51028- पंढरपूर-मुंबई (पॅसेंजर) या गाड्या दि.30 नोव्हेंबरपर्यंत, 51029 मुंबई-विजापूर दि.27 नोव्हेंबरपर्यंत, 51030 विजापूर-मुंबई 28 नोव्हेंबरपर्यंत तर 07618 पनवेल-नांदेड साप्ताहिक विशेष रेल्वे 24 नोव्हेंबरपर्यंत रद्द तर पुणे-भुसावळ आणि भुसावळ-पुणे (भुसावळ एक्स्प्रेस) दौंड-मनमाडमार्गे धावणार आहेत.
या गाड्या पुण्यापर्यंतच धावणार
मुंबईपर्यंत जाणाऱ्या कोल्हापूर-मुंबई, हुबळी-एलटीटी (ुकर्ला), हैदराबाद-मुंबई, विशाखापट्टनम-एलटीटी, नांदेड-पनवेल या गाड्या पुण्यापर्यंतच धावणार आहेत. तर मुंबईतून सुरू होणारा मुंबई-कोल्हापूर,एलटीटी-हुबळी, मुंबई-हैदराबाद, पनवेल -नांदेड, एलटीटी-विशाखापट्टनम या गाड्यांचा प्रवास पुण्यातून सुरू होईल.