मंचर -पारगांव-शिंगवे (ता. आंबेगाव) येथील तनिष्का हॉटेल आणि पोंदेवाडी येथील प्रियंका ढाब्यामधून 8 हजार 529 रुपयांच्या दारुच्या बाटल्या मंचर पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली, अशी माहिती पोलीस कर्मचारी सागर गायकवाड यांनी दिली.पोंदेवाडी येथील प्रियंका गार्डन ढाबा येथे मोहन देवराम मोरे हा दारु विक्री करत होता.
प्रियंका ढाब्यामधून एकूण 2 हजार 760 रुपयांच्या दारुच्या बाटल्या मंचर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पारगाव येथील हॉटेल तनिष्का मध्ये नथु धोंडिबा दातखिळे हा दारु विक्री करत होता. पोलीस आल्याची चाहूल लागताच तो पळून गेला.