पाकिस्तानमध्ये गारपिटीचे 8 बळी

पेशावर – पाकिस्तानच्या वायव्य भागात झालेल्या मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे किमना 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 54 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
प्रंतिय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार पेशावरमध्ये 3, स्वाबीमध्ये दोन आणि कोहात, खैबर पख्तुनवा प्रांतांमध्ये आणि मोहमांद जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका व्यक्‍तीचा गारपिटीमुळे मृत्यू झाला.

देशभरात झाडे पडणे, घरांच्या भिंती पडण्याच्या वेगवेगळ्या घटना घटनांमध्ये किमान 54 जण जखमी झाले. खैबर पख्तुनवा प्रंतात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. 22 फेब्रुवारीला झालेल्या मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे किमान 10 जण मरण पावले होते, असेही प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.