आयपीएलमधील कामगिरीवरुन राष्ट्रीय संघात निवड नाही – प्रसाद

नवी दिली  – आयपीएलनंतर विश्‍वचषक स्पर्धा होणार आहे. विश्‍वचषकासाठी अजूनही भारतीय संघाची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे काही जणांना आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवण्याची आशा होती. मात्र, आता आयपीएमध्ये चांगली कामगिरी केली तरी त्या खेळाडूला विश्‍वचषकाच्या भारतीय संघात स्थान देता येणार नसल्याचे स्पष्टीकरण निवडसमितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी दिले आहे.

याबाबत बोलताना प्रसाद यांनी सांगितले की, यंदाच्या आयपीएलवर निवड समितीचे जास्त लक्ष नाही. कारण यंदाच्या आयपीएलचा विश्‍वचषकातील संघबांधणीवर कोणताही परीणाम होणार नाही. विश्‍वचषकासाठी कोणत्या खेळाडूंना संधी द्यायची हे आम्ही आयपीएल पाहून यंदा ठरवणार नाही. त्यातच येत्या 15 तारखेला विश्‍वचषकासाट्‌य्हईचा भारतीय संघ घोषित केला जाण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.