7th pay commission HRA Hike: कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून वाढीव महागाई भत्त्याची भेट मिळाली आहे. त्यानंतर आता सरकार लवकरच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या एचआरए (घर भाडे भत्ता House Rent Allowance) वाढवू शकते. सरकारने दिवाळी पूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस, डीए आणि थकबाकी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने डीए मिळत आहे. एचआरए वाढ डीए वाढीनंतर होणार आहे.
DoPTच्या मते, कर्मचार्यांचा घरभाडे भत्ता डीएनुसार सुधारित केला जातो. शहरांनुसार एचआरएच्या श्रेणी भिन्न आहेत. सध्या, शहर X मधील लोकांना 27 टक्के दराने HRA मिळते, शहर Y मधील लोकांना 18 टक्के आणि शहर Z मधील लोकांना 9 टक्के दराने मिळते.
एचआरए जानेवारीमध्ये सुधारित केले जाऊ शकते –
झी बिझनेसनुसार, एचआरएचे रिव्हिजन डीए वाढीनुसार केले जाईल. सध्या, पुढील वाढ वर्ष 2024 मध्ये होणार आहे. जानेवारीच्या सुरुवातीलाच त्यात वाढ होऊ शकते. असे मानले जाते की एचआरएमध्ये पुढील सुधारणा 3 टक्के असेल.
HRA 30 टक्के होवू शकतो –
सध्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 27 टक्के दराने एचआरए मिळत आहे. त्यात आता 3 टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर एकूण एचआरए 30 टक्के होवू शकते. X श्रेणीत येणार्या केंद्रीय कर्मचार्यांना 27 टक्के HRA मिळत आहे. DA 50 टक्के झाल्यास एचआरए 30 टक्के होईल. त्याच वेळी, Y वर्ग लोकांसाठी ते 18 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढेल. झेड वर्गातील लोकांसाठी ते 9 टक्क्यांवरून 10 टक्के होईल.
DA 50 टक्के झाल्यास काय होईल?
50 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश X श्रेणीत करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या मेमोरँडमनुसार, जर डीए 50 टक्के ओलांडला तर एचआरए 30 टक्के, 20 टक्के आणि 10 टक्के होईल.
3 महिन्यांचे पैसे थकबाकी म्हणून दिले जातील –
अलीकडेच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. सरकारने डीएमध्ये 4 टक्के वाढ केली आहे. आता कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने डीए मिळणार आहे. याशिवाय जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे थकबाकीच्या स्वरूपात मिळणार आहेत.