7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात बंपर पगार मिळणार आहे. मार्च महिन्यात, केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीची DA थकबाकी, मार्चचा वाढलेला DA आणि HRA मिळेल. केंद्र सरकारने मार्चमध्ये महागाई भत्त्यात (DA) 4% ने वाढ केली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए आता 50 टक्के झाला आहे.
केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत (DR) देखील 4% वाढून 50% पर्यंत वाढ झाली आहे. वाढीव DA आणि DR 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल. याचा फायदा सुमारे 49.18 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना होणार आहे. महागाई भत्ता हा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगाराचा एक भाग आहे. त्यामुळे जेव्हा डीए वाढेल, तेव्हा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगारही वाढेल. मार्चमध्ये पगार नेमका किती वाढेल जाणून घेऊया…
पगारात 4% डीए वाढ होईल –
उदाहरणार्थ केंद्र सरकारच्या एका कर्मचाऱ्याला दरमहा 45,700 रुपये मूळ वेतन मिळते. यापूर्वी 46 टक्के दराने त्यांचा महागाई भत्ता 21,022 रुपये होता. महागाई भत्ता 50 टक्क्यांनी वाढल्याने त्याचा महागाई भत्ता 22,850 रुपये होईल. त्यामुळे त्याला 1,828 रुपये अधिक मिळतील. 22,850 वरून 21,022 रुपये वजा करून हे आले आहे.
50 टक्के डीएमुळे HRA वाढला –
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता (HRA) मिळतो, जो ते कुठे राहतात यावर अवलंबून असते. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, 1 जुलै 2017 पासून दर्जा एक्स, वाई आणि झेड शहरांसाठी एचआरए मूळ वेतनाच्या अनुक्रमे 24%, 16% आणि 8% करण्यात आला आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार जेव्हा DA 25% वर पोहोचला, तेव्हा X, Y आणि Z शहरांमधील HRA दर मूळ वेतनाच्या 27%, 18% आणि 9% पर्यंत सुधारित केले गेले. आता डीए 50 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर सरकारने त्यात पुन्हा सुधारणा केली आहे.
एचआरए पगारात इतकी वाढ होईल –
45,700 रुपये मूळ पगार मिळवणारा केंद्र सरकारचा कर्मचारी Y श्रेणीच्या शहरात राहतो असे समजू या. आतापर्यंत त्याचा एचआरए 8226 रुपये होता. एकदा DA 50% वर पोहोचल्यावर, त्यांचा HRA 20% पर्यंत वाढेल. त्यामुळे आता त्याचा एचआरए 9,140 रुपये करण्यात येणार आहे. म्हणजेच आता त्याला दर महिन्याला पूर्वीपेक्षा 914 रुपये अधिक मिळतील.