“मिशन रक्षा ग्यान शक्‍ती’ अंतर्गत 730 आंतरराष्ट्रीय पेटंट

पुणे – संरक्षण मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या “मिशन रक्षा ग्यान शक्ती’ या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 730 आंतरराष्ट्रीय पेटंट दाखल करण्यात आले असून, लवकरच 1 हजार पेटंट दाखल करण्याचे उद्दिष्ट गाठण्याचा मानस आहे. या उपक्रमामुळे लघु, मध्यम उद्योजन आणि सेवा क्षेत्राला मोठ्या प्रमाणता प्रोत्साहन मिळत असल्याचे मंत्रालयाकडून सांगितले जात आहे.

‘मेक इन इंडिया’अंतर्गत लष्करी शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये स्वदेशी बनावटीला चलना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयातर्फे “मिशन रक्षा ग्यान शक्ती’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील उद्योजकांकडून 2018-19 या वर्षात 730 आंतरराष्ट्रीय पेटंट दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये लष्करासाठी आवश्‍यक शस्त्रास्त्रनिर्मिती करणे, विविध तंत्रज्ञान, उत्पादने यांचा समावेश आहे. त्यासाठी “डिफेन्स स्टार्ट अप’लाही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच फायदा म्हणून देशभरातून मोठ्या प्रमाणात उद्योजक संरक्षण विषयक निर्मितीकडे आकर्षित होत आहे.

विशेष म्हणजे, यामध्ये लघु आणि मध्यम स्तरावरील उद्योजकांकाचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आगामी काळात निश्‍चितच 1000 पेटंट दाखल करण्याचा टप्पा पार करणार, अशी अपेक्षा लष्कर प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)