नवी दिल्ली : दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने मद्य प्रेमींना मोठा झटका दिला आहे. दिल्लीमध्ये दारु विक्रीवर ‘विशेष कोरोना शुल्क’ लावला आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना आता दारु एमआरपीपेक्षा 70 टक्के जास्त महाग मिळणार आहे. आज सकाळपासून नवे दर लागू झाले असल्याचे सांगण्यात येत आहेत.
दारुच्या एमआरपीवर 70 टक्के कर अधिक वसूल केला जाणार आहे. दारुच्या दुकानांबाहेर गर्दी हटवण्याचा उपाय म्हणून दिल्ली सरकारच्या या निर्णयाकडे पाहिलं जात आहे. गृहमंत्रालयाने 4 मे पासून लॉकडाऊनचा कालावधी दोन आठवड्यांसाठी आणखी वाढवला. ग्रीन आणि झोनमध्ये मद्य आणि तंबाखूची दुकानं सुरु करण्यास परवानगी दिली.
Delhi Government has imposed ‘Special Corona Fees’- 70% tax on Maximum Retail Price of the liquor. It will be applicable from tomorrow. pic.twitter.com/8NUeOMJSXV
— ANI (@ANI) May 4, 2020
तसेच रेड झोनमध्येही कन्टेंटन्मेंट क्षेत्र वगळता दारु विक्रीला परवानगी मिळाली. यानंतर देशभरात जवळपास 40 दिवसांनी दारुची दुकाने पुन्हा सुरु झाली आणि मद्यप्रेमींची, तळीरामांची दारु खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेले.
दारुच्या बऱ्याच दुकानांबाहेरील गर्दी अनियंत्रित झाल्याने आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न झाल्याने दुकाने बंद करावी लागली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.