पुसेसावळी – कराड उत्तर मतदारसंघातील गावजोड रस्ते, ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग तसेच इतर सोयीसुविधांसाठी 60.76 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती कराड उत्तर भाजपचे नेते धैर्यशील कदम यांनी दिली. महायुती सरकार आल्यामुळे कराड उत्तरमध्ये विकास कामांचा झंझावात सुरु झाला आहे. तसेच भविष्यातही मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासकामे खेचून आणली जातील, असे कदम यांनी सांगितले.
या प्रलंबित विकास कामांच्या निधीसाठी कराड उत्तर भाजपचे नेते, पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे, असे त्यांनी सांगितले.
यामध्ये पळशी ते उंचीठाणे रस्ता सुधारणा करणे 3 कोटी, लाडेगाव ते वांझोळी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण 2.5 कोटी, वडगाव ज. स्वा. येथे कुरणवस्ती रस्ता नांदणी नदीवर पूल बांधणे 8.5 कोटी,
कराड तालुक्यातील धावरवाडी ते पाल रस्ता सुधारणा करणे 25 लाख, अंतवडी पोहच रस्ता सुधारणा करणे 30 लाख, मसूर रेल्वे स्टेशन ते कोणेगाव रस्ता सुधारणा करणे 2 कोटी, वसंतगड तळबीड वराडे हनुमानवाडी शिरवडे रस्ता सुधारणा करणे 2 कोटी, यशवंतनगर गाडीतळ ते मसूर शिरवडे रस्ता सुधारणा करणे 30 लाख, तासवडे ते वराडे रस्ता सुधारणा करणे 30 लाख, करवडी ते आरफळ कॉलनी रस्ता सुधारणा करणे 30 लाख, पाल खंडाईत वस्ती ते अतीत रस्ता सुधारणा करणे 30 लाख, चोरजवाडी- मस्करवाडी ते साखरवाडी रस्ता सुधारणा करणे 30 लाख, किवळ ते घोलपवाडी रस्ता सुधारणा करणे 30 लाख, पाडळी ते गायकवाडी रस्ता सुधारणा करणे 30 लाख,
साखरवाडी ते जंगलवाडी रस्ता सुधारणा करणे 30 लाख, रा. मा 4 ते पेरले रस्ता मजबुतीकरण व सुधारणा करणे 2.50 कोटी, मसूर ते शहापूर फाटा चौपदरीकरण व सुधारणा करणे 2.20 कोटी, रेठरे बु पाचुंद रस्ता सुधारणा करणे 20 लाख, विरवडे ते करवडी रस्ता सुधारणा करणे 51 लाख, निसरे फाटा ते कळंत्रेवाडी ते उंब्रज 4 कोटी, सयापूर जोड रस्ता 25 लाख, ग्रा. मा 4 ते कोट्री ते जुने गावठाण रस्ता सुधारणा करणे 35 लाख, पिंपरी ते सुर्ली रस्ता सुधारणा करणे 20 लाख, रा मा 142 ते बोरबन रस्ता सुधारणा करणे 20 लाख, तारगाव ते टकले रस्ता सुधारणा करणे 20 लाख, अपशिंगे ते नलवडेवाडी रस्ता सुधारणा करणे 30 लाख, टकले जोडरस्ता सुधारणा करणे 40 लाख,
बोरगाव ते किरोली रुंदीकरण व रस्ता सुधारणा करणे 3 कोटी, तारगाव पुल ते तारगाव स्टेशन रुंदीकरण व सुधारणा करणे 2 कोटी, नागझरी वाठार ते इंगळेवस्ती रस्ता रुंदीकरण व सुधारणा करणे 3 कोटी, साप- वेळू रस्ता सुधारणा करणे 20लाख, आंबेवाडी ते देशमुखनगर रस्ता रुंदीकरण व सुधारणा करणे 3.5 कोटी, जावळवाडी ते नांदगाव कृष्णा नदी पुलाचे रुंदीकरण करणे 4कोटी, अंगापूरतर्फे तारगाव ते कामेरी रस्ता सुधारणा करणे 1.5 कोटी, आंबेवाडी ते नांदगाव चौक रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे 3 कोटी, तारगाव पुल ते तारगाव स्टेशनमधील रुंदीकरण व सुधारणा करणे 2 कोटी, निसराळे रस्ता सुधारणा करणे 2.5कोटी, बोरगाव ते वाघवस्ती रस्ता सुधारणा करणे 1.3 कोटी, जावळवाडी चौक ते लिंबाची वाडी रस्ता सुधारणा करणे 2.5कोटी.