पिंपरी – भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्यांचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सोमय्या यांच्या या व्हिडीओनंतर पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना (ठाकरे गट) च्या शहर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.
शहरातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मोशी-प्राधिकरण येथील स्पाईन सिटी चौकात सोमय्या यांच्या प्रतिमेला मंगळवारी (दि.18) जोडे मारो आंदोलन केले. यावेळी ठाकरे गटाच्या महिला आघाडी जिल्हा संघटक सुलभा उबाळे, पुणे जिल्हा प्रमुख गौतम चाबुकस्वार, धनंजय आल्हाट, निलेश मुटके, शहर संघटिका अनिता तुतारे, मंगल भोकरे, रजनी वाघ, वैशाली काटकर, तस्लिम शेख, ज्योती भालके, वंदना वाल्हेकर, वंदना खंडागळे, कलावती नाटेकर, आरती कांबळे, लक्ष्मी काची, संतोष पवार, संदीप भालके, नितीन दर्शले, अमित दर्शले, गणेश आहेर, अंकुश पवार, संतोष म्हात्रे, दस्तगीर मणियार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमय्या यांचा सोमवारी (दि.17) अश्लील व्हिडीओ एका वृत्तवाहिनीने दाखविल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या चांगलेच अडचणीत आले आहेत. दुसरीकडे इतर नेत्यांवर वारंवार आरोप करण्याची ख्याती असलेल्या सोमय्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, तेही विरोधकांच्या रडारवर आले आहेत.