नवी दिल्ली – दिवाळी काळात गेल्या 18 दिवसांत दिल्लीत तब्बल 3.04 कोटी दारूच्या बाटल्यांची विक्री झाली आहे. याची एकूण किंमत तब्बल 525.84 कोटी रुपये इतकी आहे. गेल्यावर्षी दिवाळीपूर्वी याच काळात 2.91 कोटी दारूच्या बाटल्यांची विक्री झाली होती. उत्पादन शुल्क विभागाने याबाबबतची आकडेवारी जाहीर केली आहे. 2022 च्या तुलनेत यावर्षी जवळपास दुप्पट मद्यविक्री झाली आहे.
दिवाळीच्या दोन दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी (10 नोव्हेंबर) 18 लाख 89 हजार 969बाटल्या विकल्या गेल्या. 15 लाख 4 हजार इतका होता. गेल्या वर्षी दिवाळीच्या एक दिवस आधी 19 लाख 39 हजार 494बाटल्यांची विक्री झाली होती. या तुलनेत शनिवारी (दिवाळीच्या 1 दिवस आधी) तब्बल 27 लाख 83 हजार 175 दारूच्या बाटल्यांची विक्री झाली आहे.
“सध्या सणासुदीचा हंगाम आणि ‘ड्राय डे’ असल्यामुळे या काळात मद्याची विक्री वाढते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत सामान्यतः ड्राय डे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे, या काळात सरासरी दारुची विक्री वाढते.” – उत्पादन शुल्क विभाग अधिकारी