मुंबई – आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकडे ()Loksabha Election 2024 संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यातील भाजप सरकारांचे देखील भविष्य ठरणार आहे. महाराष्ट्रात आगमी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी (MVA) विरोधात शिंदे भाजप सरकार अशीच होणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. त्या अनुषंगाने लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं असल्याचं बोललं जात आहे.
लोकसभेसाठी मविआची 44 जागांवर बोलणी पूर्ण झाली असलयाचे समजते. यामध्ये ठाकरे गट (Thackeray Group) 19 ते 21, काँग्रेस (Congress) 13 ते 15, शरद पवार गट (Sharad Pawar Group) 10 ते 11 जागा लढेल. तर चार जागांवर चर्चेतून निर्णय निघणार असल्याचे समजते.
महाविकास आघाडीत (MVA) दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अकोला आणि हातकणंगलेची जागा राखीव ठेवल्या आहेत. वंचित आल्यास अकोल्याची जागा दिली जाईल. वंचित न आल्यास जागा काँग्रेसकडे जाईल. हाणकणंगलेची जागा राजू शेट्टींसाठी (Raju Shetty) राखीव ठेवण्यात आली आहे. राजू शेट्टी महाविकास आघाडीत न आल्यास ही जागा पवार गट लढवणार असल्याचं देखील बोललं जात आहे.
महाविकास आघाडी विरुद्ध केवळ शिंदे फडणवीस असा सामना होणार कि अजित पवार यांचा गट देखील असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडी प्रमाणे शिंदे फडणवीस सरकारचा लोकसभेसाठी नेमका कसा फॉर्म्युला असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Shinde Fadanvis Sarkar)