पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापनदिनानिमित्त आणि “जागतिक दृष्टीदान दिवसा’चे औचित्य साधून मरणोत्तर नेत्रदान संकल्प कार्यक्रम पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात झाला.
507 कार्यकर्त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचे फॉर्म भरून संकल्प केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. सुनिता मोरे आणि कै. खाशाबा मोरे चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने या नावीन्यपूर्वी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार वंदना चव्हाण, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी मरणोत्तर नेत्रदानाचे फॉर्म भरून या उपक्रमाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, ऍड. भगवान साळुंखे आदी उपस्थित होते.