गोदावरी पूर्व ( आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात एका 50 वर्षीय महिलेवर तिघांनी सामुहिक बलात्कार करून तिची हत्या केली. पिडीता घरात एकटी आसल्याचे पाहून तिघांनी हे दुष्कर्म केले.
पिडिता घरी एकटी असताना तीन जण तिच्या घरी घुसले. त्यांनी तिच्यावर बलात्लार केला. त्यानंतर तिची हत्या केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. या महिलेचा पती आणि मुलाचा मृत्यू झाला असून तिची मुलगी हैदरावाद येथे राहते. तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत आरोपींनी कृत्य केले, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री एम सुचित्रा यांनी अचानक जाऊन महिला पोलिस ठाण्याची पाहणी केली. त्यांनी महिलांच्या तक्रारीची संवेदनशीलतेने हाताळणी करण्याची सूचना केली. आंध्रात महिलांविरूध्दचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचे आदेश दिले.