पुणे : पार्ट टाइम नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका 29 वर्षीय महिलेची 5 लाख 45 हजारांची फसवणूक सायबर चोरट्याने केली आहे.
याबाबत संबंधित महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार एक मोबाइल क्रमांक धारक तसेच टेलिग्राम युजर आणि विविध बॅंक खातेधारक यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 8 एप्रिल ते 9 एप्रिल 2023 दरम्यान ऑनलाईन घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सायबर चोरट्याने फिर्यादी यांना पार्ट टाइम नोकरी देण्याचे सांगून इंडिया मधील काही फेमस स्पॉटच्या लिंक पाठवणार आहे.
त्यानं ठिकाणांच्या गुगल मॅप वर जाऊन रेटिंग, रिव्हीव्यू, कमेंट कराव्यात जेणेकरून सदर व्यवसायाची प्रसिद्धी होते आणि त्याच्या फायदा कंपनीला होतो. त्या बदल्यात कंपनीकडून पैसे मिळणार असे सांगून टेलिग्राम लिंक जॉईन करून घेतली.
त्यांना वेगवेगळे टास्क देऊन त्याबदल्यात त्यांचा फायदा होत असल्याचे भासवून फिर्यादी यांची फसवणूक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील करत आहेत.