नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय ‘आप’चे दुसरे खासदार संजय सिंह यांच्याही अडचणी कमी झालेल्या नाहीत. त्यांच्या निलंबनाची मुदतही वाढवण्यात आली आहे. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आपच्या दोन्ही नेत्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.यानंतर आता राघव चड्डा यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर बदल केला आहे. जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
राघव चड्डा यांनी आपलय ट्विटरवरील बायोमध्ये बदल केला आहे. यापूर्वी चड्डा यांच्या बायोमध्ये केवळ खासदार असा उल्लेख होता मात्र राज्यसभेतून निलंबित झाल्यानंतर चड्डा यांनी ‘निलंबित खासदार’ असा उल्लेख आपल्या बायोमध्ये केला आहे. हा बदल सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच लक्षवेधी ठरत आहे.
दिल्ली प्रस्तावात फेरफार केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी ही कारवाई केली आहे.याशिवाय ‘आप’चे दुसरे खासदार संजय सिंह यांच्याही अडचणी कमी झालेल्या नाहीत. त्यांच्या निलंबनाची मुदतही वाढवण्यात आली आहे. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आपच्या दोन्ही नेत्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.