कोरेगाव – एकंबे (ता.कोरेगाव) येथील शेतकऱ्याला बारा कोयते व २४ मजूर देतो असे सांगून त्यांच्याकडून ५ लाख ६० हजार रुपये घेऊन मध्य प्रदेशमधील चौघांनी फसवणूक केल्याचा गुन्हा कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकंबे येथील शेतकरी सतीश नारायण चव्हाण यांना 12 कोयते आणी 25 मजूर देतो असे सांगून मध्य प्रदेशमधील डेबा तेरसिग चौहान (वय ३५, रा. मोहनपाडवा जि. बलवाडी, जुवानसिंग परमालीया, रा. झिरपन), राजेश ओलावे (पूर्ण नाव माहीत नाही), वय ३५ रा. शेंदवा, जि. वडवाणी, जगदीश डुडवे (पूर्ण नाव माहीत नाही, वय ३५, रा. मोहनपाडवा, जि. बालवाडी, सर्व रा. मध्यप्रदेश) यांनी २०२२- २३ ऊस गाळप हंगामासाठी बारा कोयते व २४ मजूर देतो असे सांगून ५ लाख ६० हजार रुपये घेऊन फसवले आहे. याबाबत चव्हाण यांनी चौघांविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.