Annual Salary Hike For Bank Employees| लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे निर्णय घेतले जात आहे. यात आता बँक कर्मचाऱ्यांना देणारी माहिती समोर आली आहे. पगारवाढीबरोबरच बँक कर्मचाऱ्यांना आता सरसकट 5 दिवसांच्या आठवड्याचा लाभ मिळू शकणार आहे. इंडियन बँक असोसिएशन आणि बँक कर्मचारी संघटनांनी 17 टक्के वार्षिक वेतनवाढ करण्यास सहमती दर्शविली आहे.
7 लाख बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार फायदा
याशिवाय आठवड्यातून पाच दिवस कामकाजाचही आयबीएनं स्वीकार केला आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने एका नोटमध्ये म्हटले आहे की, सुधारित कामाचे तास सरकारच्या अधिसूचनेनंतर लागू होतील. यासंदर्भातील द्विपक्षीय करारावर शुक्रवारी बँक युनियनची संस्था असलेल्या युनायटेड फोर ऑफ बँक युनियन्स आणि इंडियन बँक असोसिएशन या दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधींनी सह्या केल्या. या वेतनवाढीचा फायदा 7 लाख बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे.
12 हजार 449 कोटींचा अतिरिक्त भार
शुक्रवारी बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात झालेल्या या निर्णयामुळे बँकांच्या व्यवस्थापकांना दरवर्षी सुमारे 12 हजार 449 कोटींचा अतिरिक्त आर्थिक भाग सहन करावा लागणार आहे. पगारवाढीचा हा करार ऑक्टोबर 2027 पर्यंत लागू असणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी बँकांना 2 हजार कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागेल.
सदर पगारवाढ ही 2022 पासून पूर्वलक्ष्यी प्रभावानुसार लागू होणार आहे. या वेतनवाढीमुळे मूळ वेतन, रजा, महागाई भत्ता, विशेष वेतन, विशेष भत्ता, घरभाडे भत्ता यासारख्या तरतूदींअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेमध्ये मोठी वाढ होणार आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी देखील विशेष सुधारणा करण्यात आली आहे.
5 दिवसांचा आठवडा? Annual Salary Hike For Bank Employees|
मागील बऱ्याच काळापासून बँक कर्मचाऱ्यांकडून पाच दिवसांचा आठवडा असावा अशी मागणी केली जात आहे. या मागणीला सदर करारामध्ये मान्यता दिली आहे. ही मागणी प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे. सध्या दर महिन्याचा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाते. मात्र आता ही सुट्टी सरसकट करावी आणि सर्व शनिवार, रविवारी सुट्टी दिली जावी या मागणी संदर्भातील मंजूर घेतली जाईल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
या करारामुळे आठवड्यातून पाच दिवस बँकिंगचा मार्ग मोकळा झाला. सध्या महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. आता आयबीएनं महिन्यातील सर्व शनिवारी बँकांना सुट्टी देण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. या बदल्यात बँकिंग कामकाज सकाळी १० ते सायंकाळी ५ ऐवजी सकाळी ९.५० ते सायंकाळी ५.३० या वेळेत करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबतचा अंतिम निर्णय सरकारने हे प्रस्ताव स्वीकारल्यानंतर आणि नियम अधिसूचित केल्यानंतर घेतला जाईल.
महिला बँक कर्मचाऱ्यांना विशेष परवानगी Annual Salary Hike For Bank Employees|
नवीन वेतन करारानुसार सर्व महिला कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र न देताही दर महिन्याला एक दिवसाची आजारी रजा घेता येणार आहे.
50 लाख कर्मचाऱ्यांच्या डीएत वाढ
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए (महागाई भत्त्यात) केंद्र सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. 7 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांचा डीए 4 टक्क्यांनी वाढवून 50 टक्के करण्यात आला होता. याचा फायदा 50 लाख कर्मचाऱ्यांना तसेच 68 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. ही पगारवाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे.