Bhopal Fire । मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भीषण आगीची घटना घडलीय. भोपाळमध्ये राज्य सरकारच्या मंत्रालयाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडलीय. आग एवढी होती कि इमारतीच्या चार मजल्यापर्यंत आग पसरली. मंत्रालयाच्या इमारतीच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग Bhopal Fire ।
भोपाळमधील वल्लभ भवन राज्य सचिवालयाला शनिवारी सकाळी भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडलीय. मंत्रालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत आग पसरली. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आग नेमकी कशामुळे लागली?
भोपाळच्या सचिवालयात अचानक आग लागल्याची बातमी समोर आली आहे. 9 मार्चला सकाळी सचिवालयाच्या इमारतीतून काळ्या धुराचे लोट बाहेर पडताना दिसले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
#WATCH | Madhya Pradesh | A massive fire breaks out at Vallabh Bhavan State Secretariat in Bhopal. Firefighting operations are underway. Details awaited. pic.twitter.com/QBto0QSVIy
— ANI (@ANI) March 9, 2024
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश Bhopal Fire ।
गेट क्रमांक 5 आणि 6 मधील मोठ्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली, ती पाचव्या मजल्यापर्यंत पसरली. आग वाऱ्यासह वेगाने पसरली. अग्निशमन दलाचे पाच जवान अडकल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीतून उठणाऱ्या ज्वाळा आणि धूर दुरूनच दिसत आहेत. या आगीत अनेक महत्त्वाची सरकारी कागदपत्रे जळून खाक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या आगीच्या घटनेवर चिंता व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा
पिंपरी | भंगाराच्या दुकानाला भीषण आग