ग्रामीण भागांत टीव्हीचा प्रसार
हैदराबाद, दि. 22 – माहिती व नभोवाणीमंत्री अडवानी यांनी असे सांगितले की, भारतात टीव्हीचा प्रसार असा टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून ग्रामीण भागात अधिकाधिक टीव्ही यंत्रे बसविण्यात येतील.
टीव्ही यंत्रे महाग आहेत. परंतु त्यांचे मार्फत जो सामाजिक फायदा होईल तो महत्त्वाचा आहे. पुढील वर्षापर्यंत उपग्रहाद्वारे टीव्ही दाखविण्याचा कार्यक्रम पूर्ण होईल.
स्त्री वैमानिकांचा विमानोड्डाणाचा रेकॉर्ड
लॅडिव्होस्टोक – रशियन स्त्री वैमानिकांनी मिस इराइडा व्हर्टिप्राखोव्हा हिच्या नेतृत्वाखाली जागतिक लांब पल्ल्याच्या प्रवासाचा उच्चांक मोडला आहे. त्यांनी 10,074 किमी अंतर अवघ्या 13 तासांत मोडले.
वल्गेरिया ते लॅडिव्होस्टोकपर्यंत हा विमान प्रवास झाला. त्यांनी जेटविमान वापरले होते. या रशियन स्त्री वैमानिकांनी विमानोड्डाणाचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे.