दरवर्षी दहा लाख लोकांचा मृत्यू,56 विविध आजारांचा धोका
बीजिंग : धुम्रपान आणि मद्यपान ही आधुनिक काळातील जीवनशैली झाली असून गेल्या काही कालावधीमध्ये ही दोन्हीही व्यसने मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. आता एका नव्या आकडेवारी प्रमाणे धूम्रपान करणाऱ्यांपैकी 40% लोक फक्त एकट्या चीनमध्ये आहेत. लांसेट या आघाडीच्या आरोग्य मासिकाने प्रकाशित केलेला लेखाप्रमाणे धूम्रपान करणाऱ्या लोकांना इतर लोकांपेक्षा 56 जास्त आजार होण्याचा धोका जास्त असतो.
लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे, चीनमध्ये दरवर्षी धुम्रपानामुळे दहा लाखपेक्षा जास्त लोकांचा बळी जातो. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि चीनमधील काही विद्यापीठे यांनी संयुक्तपणे हे संशोधन केले असून गेल्या 11 वर्षांच्या कालावधीत पाच लाख 12 हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला त्यामध्ये तीन लाख पेक्षा जास्त महिला होत्या बहुतेक जणांना धुम्रपानाची सवय होती.
चीनमध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच अनेकांना धुम्रपानाची सवय लागते. नंतरच्या कालावधीमध्ये ते विकसित होऊन त्याचे व्यसनात रूपांतर होते. लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे, असे व्यसन असणाऱ्या लोकांना इतर निर्व्यसनी लोकांच्या तुलनेमध्ये रक्तदाब मधुमेह हृदयविकार आणि इतर अनेक रोगांचा सामना करावा लागतो. या व्यतिरिक्त कर्करोगाचे अनेक प्रकारही धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या अनुभवास येऊ शकतात.
धूम्रपानामुळे घशाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण तब्बल 216 टक्के आहे धुम्रपानाची सवय असणाऱ्या लोकांना ज्या 56 प्रकारांच्या आजाराचा धोका असतो त्यापैकी 22 आजार हे मानले प्राणघातक मानले जातात. धूम्रपानाची सवय असणाऱ्या लोकांनी योग्य वेळेत जर धूम्रपान सोडले तर त्यांच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात असा सल्लाही या लेखात देण्यात आला आहे.