कोलोंबो – श्रीलंकेचे काळजीवाहू अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे आणि प्रमुख विरोधी पक्षनेते सजित प्रेमदासा हे नवीन अध्यक्षांच्या शर्यतीतील आघाडीवर असलेले इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्याशिवाय एकूण चारजण या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर आता नवीन अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.
विक्रमसिंघे आणि प्रेमदासा यांच्याव्यतिरिक्त मार्क्सवादी जेव्हीपी गटाचे नेते अनुरा कुमारा दिसानायके आणि “एसएलपीपी’ पक्षातून फुटून बाहेर पडलेले नेते डल्लास अल्हापेरुमा हेदेखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. या सर्वांनी 20 जुलै रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
युक्रेनवर रशियाचे नव्याने जोरदार हल्ले सुरू; मोठ्या प्रमाणावर जीवितहानी
संसदेच्या अंशकालीन अधिवेशनामध्ये अध्यक्षांचे पद रिक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. संसदेच्या सभापतींनी अध्यक्षांच्या निवडणूकीसाठीची प्रक्रियादेखील जाहीर केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारपर्यंत असेल. जर एकापेक्षा अधिक उमेदवार असतील तर बुधवारी संसदेमध्ये मतदान घेतले जाईल. राजपक्षे यांनी बुधवारी राजीनामा दिला असल्यामुळे नवीन अध्यक्षांची मुदत नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ; सरकारकडून देशद्रोहाचा खटला चालवण्याची तयारी?