नगर -जिल्ह्यात आज 316 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 59 हजार 66 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.59 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 363 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 810 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 27, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 115 आणि अँटिजेन चाचणीत 221 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 11, नगर ग्रामीण 1, पाथर्डी 6, राहाता 1, संगमनेर 3, शेवगाव 5, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 35, अकोले 8, कर्जत 3, कोपरगाव 13, नगर ग्रामीण 6, नेवासे 2, पारनेर 6, पाथर्डी 6, राहाता 12, राहुरी 5, संगमनेर 7, शेवगाव 5, श्रीरामपूर 7, अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 221 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 12, अकोले 18, जामखेड 13, कर्जत 8, कोपरगाव 9, नगर ग्रामीण 8, नेवासे 18, पारनेर 20, पाथर्डी 25, राहाता 8, राहुरी 16, संगमनेर 33, शेवगाव 13, श्रीगोंदा 4, श्रीरामपूर 15 आणि कॅन्टोन्मेंट 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 78, अकोले 19, जामखेड 8, कर्जत 7, कोपरगाव 7, नगर ग्रामीण 17, नेवासे 4, पारनेर 10, पाथर्डी 28, राहाता 46, राहुरी 13, संगमनेर 45, शेवगाव 8, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 19 आणि कॅन्टोन्मेंट 5, अशा रुग्णांचा समावेश आहे.