पुणे – अप्पर पोलिस महासंचालक विशेष अभियान महाराष्ट्र, प्रविण साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल घोरपडे पेठ मित्र परिवाराच्या वतीने मंगळवारी (दि. 6) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच मधुमेह, नेत्र, रक्तदाब तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 350 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 300 नागरिकांची नेत्र तपासणी करुन त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. तर विविध प्रकारच्या आरोग्यविषयक तपासण्या व औषधाचा 700 नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरात ससुन रक्तपेढी, आयपीएस रक्तपेढी व आनंदऋषीजी ब्लडबॅंक या रक्तपेढ्या सहभागी झाल्या होत्या.
यावेळी माजी आमदार मोहन जोशी, आमदार रविंद्र धंगेकर, गजानन थरकुडे, संजय मोरे, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, आरती कोंढरे, अजय खेडकर, हेमंत रासणे, डाॅ. मिलिंद भोई, डाॅ. गणेश परदेशी, रमेश गणगे, बाळासाहेब मालुसरे, राजाभाऊ भिलारे, अनिल बटाणे, गणेश कल्याणकर, चंदन साळुंके, रमेश कांबळे, अॅड. महेश सकट, अॅड. श्रीराम कांबळे, शिल्पा भोसले, स्वाती पुणे, अॅड. शिरीष मोहिते, बाळा शेडगे, संग्राम तळेकर यांसह विविध मंडळाचे कार्यकर्ते, पोलिस विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित राहून प्रविण साळुंखे यांना शुभेच्छा दिल्या.
मैत्रक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेट देण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष कुमार चिप्पा यांनी सर्वांचे आभार मानले, तसेच कल्याण भेळचे रमेश कोंढरे यांनी सर्व रक्तदाथ्यास नाश्ता दिला. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी किशोर राजपुत, राजाभाऊ मासोळे, संजय रणदिवे, हेमंत राजभोज, सागर कांबळे, वैभव माने, राजु मोहिते, अजय भोसले, नितिन साळुंके, निलेश इनामके, खालीद शेख, शाबिर खान, याकुब भाई आदींनी परिश्रम घेतले. किशोर राजुपत यांनी सुत्रसंचालन केले. तत्पूर्वी कमलाबाई साळुंके यांच्याहस्ते फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते.