राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या बलिदान दिनानिमिताने हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ स्मारकात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 11 महिलांसह 221 जणांनी रक्तदान केले. रक्तदाते सुनील वाळुंज यांनी त्यांच्या वैयक्तिक 116 वेळा रक्तदान करून विक्रम केल्याने त्यांना गौरविण्यात आले.
शिबिराचे उदघाटन हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख यांच्या हस्ते झाले. या शिबिराला पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील, हुतात्मा राजगुरू यांचे पुतणे सत्यशील राजगुरू, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, शांताराम भोसले, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, राजगुरूनगर सहकारी बँकचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, डॉ. राम गावडे, गणेश सांडभोर, सुशील मांजरे,
डॉ. माणिक बिचकर, अॅड. निलेश आंधळे, धमेंद्र खांडरे, बाळासाहेब कहाणे, विश्वास गोसावी, शुभांगी जगताप, अॅड. मनीषा टाकळकर, बाळासाहेब सांडभोर, शैलेश रावळ, अमर टाटीया, संजय नाईकरे, राजन जांभळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देत रक्तदात्यांचे मनोबल वाढवले व कौतुक केले. चाकण ब्लड बँक यांनी रक्तसंकलन केले.