सातारा – येथील जनता सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आज जिल्हाभरातील मतदान केंद्रावर शांततेत 32.34 टक्के मतदान झाले. 34 केंद्रावर 21 हजार 81 मतदारांपैकी 6 हजार 821 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उद्या, रविवारी सकाळी 8 वाजता बॅंकर्स हॉल येथे 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा पंडित यांनी दिली.
जनता सहकारी बॅंकेची निवडणूक 17 जागांसाठी होत आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून 16 जागा आहेत. त्यातून विनोद कुलकर्णी, आनंदराव कणसे, अक्षय गवळी, चंद्रशेखर घोडके, जयेंद्र चव्हाण, मच्छिंद्र जगदाळे, वजीर नदाफ, अविनाश बाचल, ऍड. चंद्रकांत बेबले, जयवंत भोसले, रवींद्र माने, अमोल मोहिते, वसंत लेवे, नारायण लोहार, रामचंद्र साठे, माधव सारडा हे भागधारक पॅनेलमधून, तर विरोधी गटातून एकमेव शकील बागवान निवडणूक लढवत आहेत. ओबीसी प्रवर्गातून भागधारक पॅनेलचे अशोक मोने असून त्यांच्या विरोधात चारुशील सपकाळ उभे आहेत. या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून 16 जणांना निवडून द्यायचे आहे. तर बाळासाहेब गोसावी, सुजाता राजेमहाडिक, डॉ. चेतना माजगावकर, विजय बडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.