लंडन – भारतीय वंशाचे ब्रिटिश राजकारणी ऋषी सूनक ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या देशांमधील भारतीय वंशाच्या नेत्यांबाबतही चर्चा सुरू झाली आहे एका अधिकृत आकडेवारीनुसार जगातील पंचवीस देशांमध्ये तब्बल 313 नेते भारतीय वंशाचे असून त्या देशांमध्ये यशस्वी राजकारण करत आहेत.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये जगातील दहा देशांमध्ये भारतीय वंशाच्या नेत्यांनी राष्ट्रप्रमुखपदही भूषविले आहे ब्रिटनमध्येही आत्तापर्यंत 20 भारतीय वंशाच्या लोकांनी राजकारणात यशस्वी होऊन दाखवले आहे मॉरिशससारख्या देशांमध्ये भारतीय वंशाच्या नेत्यांनी दहा वेळा पंतप्रधान होण्याचा मान मिळवला आहे 1968 पासून ही परंपरा सुरू झाली असून ती अद्यापही कायम आहे.
भारतीय वंशाचे राजकीय नेते सर्वात जास्त अमेरिकेमध्ये आहेत आत्तापर्यंत 41 भारतीय वंशाच्या नागरिकांनी अमेरिकेत राजकारण यशस्वी करून दाखवले आहे त्यानंतर कॅनडामध्ये आतापर्यंत 37 राजकीय नेत्यांनी आपला राजकारणाचा ठसा उमटवला आहे फीजी त्रिनिनाद मलेशिया दक्षिण आफ्रिका या देशांमध्येही भारतीय वंशाच्या राजकारण्यांचा बोलबाला आहे.
मॉरिशस व्यतिरिक्त सूरीनाम गयाना सिंगापूर या देशांचे राष्ट्रप्रमुखपद कधी ना कधी भारतीय वर्षाच्या नेत्यांनी भूषवले आहे महाराष्ट्रातील कोकणातील असलेले लिओ वराडकर यांनी आयर्लंडचे पंतप्रधान होण्याचा मान मिळवला होता नजीकच्या कालावधीमध्ये ऋषी सूनक यांना जर ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर भारतीय वंशाचा नेता एखाद्या देशाचा राष्ट्रप्रमुख होण्याची ती अकरावी वेळ ठरणार आहे.