द ऑर्बिस स्कूलसच्या केशवनगर व मुंढवा या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी या वर्षी पुन्हा एकदा दहावीच्या निकालांमध्ये सातत्य दाखवले आहे, दोन्ही शाळेचा निकाल हा १००% लागला असून शाळेने सीबीएसई परीक्षा २०२२ मध्ये अतुलनीय प्रगती केली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये उत्तम गुण प्राप्त करून यावर्षी देखील शाळेचे नाव उंचावले आहे.
द ऑर्बिस स्कूल, केशवनगर मध्ये प्रथम तीन आलेले विद्यार्थी :
1. अनिमेष मनोज गोखले : ९८.६%
2. मानव शर्मा: ९८.४%
3. अर्चिनी पाटील : ९८.२%
4. वैकटनागा वैष्णव गड़मसे: ९८.२%
द ऑर्बिस स्कूल, मुंढवा मध्ये प्रथम तीन आलेले विद्यार्थी :
1. संजीत रॉय : ९७.४%
2. कृष्णा नोहवाल: ९७.२%
3. तनिष्क कोठारी: ९६.६%
यावेळी बोलताना द ऑर्बिस स्कूलच्या संचालक मुख्याध्यापिका श्रीमती गुंजन श्रीवास्तव म्हणाल्या की “उत्तम कामगिरी कधीही नशिबाची नसते, त्या उत्तम कामगिरी मागे खूप परिश्रम आणि मेहनत लागते. गेलेले वर्ष विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी देखील असामान्य आणि अनपेक्षित होते. या कठीण काळात विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी केलेल्या परिश्रमाचे आश्चर्यकारक परिणाम आज दहावीच्या निकालात मिळाले आहेत. या सर्वांचे खूप खूप अभिनंदन!”
शाळा सर्व विद्यार्थी, त्यांचे कुटुंब आणि शिक्षक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, ज्यांनी या गेल्या पूर्ण वर्षभरात मेहनत करून दहावीच्या उत्तम निकालात हातभार लावला.
दहावी हे विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण वळण आहे. द ऑर्बिस स्कूल मध्ये विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक शिक्षण पर्याय असल्यामुळे, आम्ही आमच्या व इतर शाळांमधील इयत्ता ११ला येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाट पाहत आहोत.