ग्वाल्हेर : मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे घरात फटाक्यांचा स्फोट होऊन तीन जण मरण पावले तर पाच जण जखमी झाले.
नोनके सराई या गावातील एका घरात बेकायदा फटाके बनवत असताना गुरूवारी रात्री हा स्फोट घडला. हा स्फोट एवढा भयानक होता, की इमारतीचे छत कोसळले. त्याखाली अनेक जण गाडले गेले. मृतांची ओळख पटली असून नबी खान, त्यांची कन्या रझिया आणि नातेवाईक अब्रिन अशी मृतांची नावे आहेत. जखमींना ग्वाल्हेर येथील जयारोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.