287 चालकांनी दिली विनाअपघात सेवा

कामगार दिनी होणार बक्षिसांचे वितरण

नगर –
प्रवासी जनतेची सुरक्षित वाहतूक व्हावी. तसेच चालकांनी विना अपघात सेवा द्यावी या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाने प्रोत्साहनपर बक्षिस योजना सुरू केली असून या योजनेला चालकांकडुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा 287 चालकांनी विना अपघात सेवा दिली आहे.

राज्य परिवहनच्या नगर विभागांतर्गत ज्या चालकांनी 12 महिन्यात 260 दिवस विना अपघात सेवा दिली त्या चालकांना 1000रुपयांचे तर 12 महिन्यांपेक्षा जास्त दिवसात विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांना 600 रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते. यंदा दोनशे चार चालकांनी 1000 रुपयांचे तर 83 चालकांनी 600 रुपयांचे पारितोषिक पटकाविले आहे. नगर विभागातून यंदा एकूण दोन लाख त्रेपन्न हजार आठशे रुपये इतक्‍या रकमेचे पारितोषिक वितरण 1 मे रोजी कामगार दिनी चालक काम करित असलेल्या आगारात देण्यात येणार आहे. सर्व बक्षीस पात्र चालकांचे विभाग नियंत्रक व्ही. एन. गिते यांनी अभिनंदन केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.