सातारा -जिल्ह्यात करोनामुळे मृत होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कायम असून त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यातील 27 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा ल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. करोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1187 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खेड ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, धावडी ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, किकली ता. वाई येथील 84 वर्षीय पुरुष, मदनेवाडी ता. पाटण येथील 58 वर्षीय पुरुष, चाहूर ता. सातारा येथील 49 वर्षीय पुरुष तर जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दहिवडी ता. माण येथील 57 वर्षीय पुरुष, कंजरवाडी देगाव, ता. सातारा येथील 89 वर्षीय पुरुष, जरंडेश्वर नाका, ता. सातारा येथील 74 वर्षीय महिला, पिंपरी ता. कोरेगाव येथील 50 वर्षीय पुरुष, फलटण येथील 55 वर्षीय महिला, सोनवडी ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष,
धुमाळवाडी ता. फलटण येथील 62 वर्षीय पुरुष, फलटणच्या बुधवार पेठेतील 68 वर्षीय पुरुष, भुईंज ता. वाई येथील 69 वर्षीय पुरुष, बिदाल ता. माण येथील 46 वर्षीय महिला, बोंडारवाडी ता. महाबळेश्वर येथील 58 वर्षीय पुरुष तसेच जिल्हा रुग्णालयाने उशिरा कळविलेले कोर्टी ता. कराड येथील 64 वर्षीय पुरुष, मोळ ता. खटाव येथील 54 वर्षीय पुरुष, निजरे ता. सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, कासारशिंरबे ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, कराडच्या रविवार पेठेतील 70 वर्षीय पुरुष,
चिंचणी ता. कडेगाव सांगली येथील 56 वर्षीय पुरुष, गोवारे ता. कराड येथील 80 वर्षीय महिला, चोरमारवाडी ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, जिंती औंध ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, विसापूर ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, गिरवी ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 27 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.