प्रतिभा पाचपुतेंनी देखील दाखल केला भाजपकडून अर्ज
श्रीगोंदा – विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंतम 20 उमेदवारांनी 25 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उद्या (दि.5) उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून सोमवारी (दि.7) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
उमेदवार, कंसात अर्जांची संख्या आणि पक्ष पुढीलप्रमाणे आहे.- बबनराव पाचपुते (3 अर्ज)- भाजप, प्रतिभा पाचपुते (1अर्ज)- भाजप, सुनील उदमले (2 अर्ज ) – अपक्ष, सुनील ओहळ ( 1अर्ज ) – बहुजन समाज पक्ष, हरिश्चंद्र पाचपुते ( 1 अर्ज) – अपक्ष, अनुराधा राजेंद्र नागवडे ( 2 अर्ज)- अपक्ष, घनश्याम शेलार (2 अर्ज)- राष्ट्रवादी, टिळक भोस (1 अर्ज) – संभाजी ब्रिगेड पक्ष, मच्छिंद्र सुपेकर (1 अर्ज)- वंचित बहुजन आघाडी, प्रविण मांडे ( 1 अर्ज) – अपक्ष, अण्णासाहेब शेलार (1 अर्ज) – अपक्ष, रत्नमाला ठुबे (1अर्ज) – अपक्ष, विनोदसिंग परदेशी ( 1अर्ज) – प्रहार जनशक्ती पक्ष, तात्याराम बलभीम घोडके(1अर्ज) – बहुजन मुक्ती पक्ष, प्रमोद काळे (1 अर्ज) – अपक्ष, राजेंद्र नागवडे (1अर्ज) – अपक्ष, नंदू ससाणे ( 1 अर्ज) – अपक्ष, बाळू जठार (1 अर्ज) – भारतीय शेतकरी कामगार पक्ष, दत्तात्रय आडबले ( 1अर्ज) – अपक्ष, दादा शिरवाळे (1 अर्ज) – अपक्ष.