ओतूर -जुन्नर तालुका शिवसेना व युवासेना परिवाराच्या संयुक्त विद्यमाने ओतूर (ता. जुन्नर) जवळील डोमेवाडी येथे शिवजयंतीच्या निमित्ताने सोमवारी (दि. 21) भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीत एकूण 204 बैलगाडे धावले.
या बैलगाडा शर्यती साठी रोख रकमेची व भेटवस्तू ची बक्षिसे विविध मान्यवरांनी ठेवली होती. फायनल शर्यती संपल्यावर विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले, अशी माहिती शिवसेनेचे जेष्ठ नेते व जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
या बैलगाडा शर्यतीसाठी शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, माऊली खंडागळे, नेताजी डोके, मंगेश काकडे, गणेश कवडे, गुलाब पारखे, शरद चौधरी, दिलीप बाम्हणे, धनंजय डुंबरे, महेश शेळके, विकी पारखे, विकास
राऊत सर्व डुंबरवाडी ग्रामस्थ बबू भोरे, बाबाजी डुंबरे, तुकाराम डुंबरे, संदीप भोरे, विश्वास शिंगोटे आदी मान्यवर उपस्थित होते. डोमेवाडीच्या ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शर्यती पार पडल्या असे दिलीप डुंबरे म्हणाले