2021 मधील जनगणना होणार डिजीटल : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी दिल्लीत जनगणना भवनाची पायाभरणी केली. यावेळी शहा यांनी 2021 मध्ये होणारी जनगणना ही डिजीटल होणार असल्याचे शहा यांनी म्हटले. तसेच सर्व नागरिकांसाठी एक देश एक ओळखपत्र देण्याचा विचार सरकार करत असल्याची माहितीदेखील शहा यांनी यावेळी दिली. यासाठी आधार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि बॅंक खात्यासारख्या सर्व सुविधा एकाच ओळखपत्राशी जोडल्या जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

जनगणनेची संपूर्ण इमारत हरित इमारत असेल. भारतातील हरित इमारतीची संकल्पना अवलंबण्याची गरज आहे. आज बरेच बदल आणि नवीन पद्धती नंतर जनगणना डिजिटल होत आहे. 2021 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनगणनेमध्ये आम्ही मोबाइल ऍपचा देखील वापर करणार असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले. जनगणनाचा डिजिटल डेटा अनेक प्रकारच्या विश्‍लेषणासाठी वापरता येतो असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, डिजीटल प्रणालीचा उपयोग हा 2014 च्या नंतर जास्त प्रमाणात झाले असल्याचा दावादेखील यावेळी त्यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.