एखादे गुपित उघड करतील म्हणून वरिष्ठांनी घेतली चिदंबरम यांची भेट

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोनिया गांधींना लगावला टोला

मुंबई : आयएनएक्‍स मीडियात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम हे सीबीआय कोठडीत आहेत. आज सकाळी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी भेट घेतली. यावरून आता भाजपकडून टीका करण्यास सुरूवात झाली आहे. पी. चिदंबरम तपास यंत्रणांसमोर आपले एखादे महत्वाचे गुपित उघड करतील, या भीतीने कॉंग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे तिहार तुरुंगात त्यांच्या भेटीला गेले असल्याचा टोला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

पी.चिदंबरम यांची भेट घेणं हे कॉंग्रेसच्या या वरिष्ठ नेत्यांसाठी सक्तीचे बनले असावे किंवा आपले एखाद गुपित ते ईडी किंवा सीबीआयसमोर उघड करतील या भीतीमुळेच त्यांनी तुरुंगात जाऊन त्यांची भेट घेतली असावी, असा टोला यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. दरम्यान, चिदंबरम यांची भेट घेण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह सोमवारी सकाळी नऊ वाजता तिहार तुरूंगात पोहोचले होते. ईडी आणि सीबीआयच्या जाळ्यात अडकलेल्या चिदंबरम यांच्या पाठिशी कॉंग्रेस असल्याचे दर्शवण्यासाठी सोनिया गांधी या चिदंबरम यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.