अहमदाबाद – गुजरातच्या अहमदाबादमध्ये अब्दुल वहाब शेख या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. गुजरातचे दहशतवाद विरोधी पथक आणि गुन्हे शाखा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. अब्दुल हा सौदी अरबमधील जेद्दाहमधून अहमदाबादकडे येत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले.
BV Gohil,ACP Crime Branch,Ahmedabad:Terrorist Abdul Wahab Sheikh has been arrested by Gujarat Anti-Terrorism Squad (ATS),Ahmedabad Crime Branch, while he was returning from Jeddah(Saudi Arabia) to Ahmedabad.He’s accused of providing financial support in the 2003 jihadi conspiracy
— ANI (@ANI) September 23, 2019
दरम्यान, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गोहील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, गुजरात एटीएस व अहमदाबाद गुन्हे शाखेने दहशतवादी अब्दुल वहाब शेख याला अटक केली आहे. त्याच्यावर २००३ मधील एका दहशतवादी कारवाईसाठी पैसे पुरवल्याचा आरोप आहे. तो अनेक वर्षांपासून सौदीमध्ये राहत होता आणि पाकिस्तानमधील दहशतावादी संघटनांना पैसे पुरवण्याचे काम करत होता. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी त्याने पैसे पुरवले आहेत.
पोलिसांच्या या कामगिरीबद्दल गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी, दोन्ही पथकांचे अभिनंदन केले आहे. आता अब्दुल वहाब शेख याची कसून चौकशी केली जात आहे. त्याच्याकडून दहशतवादी कारवायांचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे