शिरूर -शिरूर शहरासह तालुक्यात आज 12 गावात 20 करोना बाधित रुग्ण आढळले तालुक्यात 2 वृद्धांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली.
शिरूर शहरात 5 तर शिरूर तालुक्यात 15 करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. दोन रुग्णांचा मृत्यू तालुक्याला चटका देणार आहे. शिरूर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या रोजच वाढत आहे. यासाठी प्रशासन नक्की काय भूमिका घेत आहे, हे नागरिकांना समजणे अवघड झाले आहे.
करोना बाधित रुग्णांचे नातेवाईक व हायरिक्स संपर्कात आलेले होम क्वारंटाइन नागरिक कुठल्याही नियमांचे पालन करत नसून खुलेआम फिरत आहेत. शिरूर तालुक्यात करोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात कंपनी कामगार यांच्यामुळे शिरूर तालुक्यातील डोकेदुखी वाढली आहे.
शिरूर तालुक्यातील शिरूर शहरात 5, अण्णापूर 1, मलठण 1, केंदूर 2, शिक्रापूर 1, पाबळ 1, आपटी 1, गणेगाव दुमाला 3, कारेगाव 2, शिरूर ग्रामीण 1, जांबूत 1, मांडवगण 1 असे शिरूर तालुक्यातील 12 गावात 20 करोना बाधित रुग्ण आढलेले आहेत.