पुणे: विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या याच जिल्ह्यातील 2 हजार 927 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात करोना बाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 29 झाली आहे. तर ऍक्टीव रुग्ण 2 हजार 807 आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्हयातील 5 हजार 14 बाधीत रुग्ण असून करोना बाधित 2 हजार 552 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 212 आहे. करोनाबाधित एकूण 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 190 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्हयातील 201 करोना बाधीत रुग्ण असून 106 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्टीव रुग्ण संख्या 90 आहे. करोनाबाधित एकूण 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयातील 524 करोना बाधीत रुग्ण असून 218 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्टीव रुग्ण संख्या 269 आहे. करोना बाधित एकूण 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 62 करोना बाधीत रुग्ण असून 38 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्टीव रुग़्ण 23 आहेत. तर करोना बाधित एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयातील 228 करोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्टीव रुग्ण संख्या 213 आहे. करोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यत विभागामध्ये एकुण 65 हजार 551 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 56 हजार 445 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 9 हजार 149 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 50 हजार 314 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 6 हजार 29 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 25 लाख 14 हजार 145 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 5 कोटी 38 लाख 59 हजार 124 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 584 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.