पिंपरी – भाजप नगरसेवक लक्ष्मण उंडे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत यमुना उंडे (वय 44, रा. साई पार्क, दिघी) यांनी गुरुवारी (दि. 21) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “व्हॅलेन्टाइन डे’च्या दिवशी अर्थात 14 फेब्रुवारी रोजी नगरसेवक लक्ष्मण उंडे यांनी आपला मुलगा दीपक यांना धमकी दिली.
निवडणुकीच्यावेळी राहते घर तुझ्या नावावर केले होते. आता ते माझ्या नावावर करून दे, नाहीतर तुम्हाला भीक मागायला लावेल. तुम्हाला दिघी गावात राहू देणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी दिघी पोलीस तपास करीत आहेत.