या दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…

सामी कंपनीचा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही अवघ्या ५ हजार रुपयांत

नवी दिल्ली: सध्या सर्वत्र दिवाळीची खरेदी सुरु असून त्या साठी बाजारपेठही सज्ज झाल्या आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकजण गृह उपयोगी वस्तू खरेदी करत असतात. तूम्हीही जर टीव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्या साठी एक आनंदाची बातमी आहे. सामी इन्फोरमॅटिक्स (Samy Informatics) कंपनीने भारतात एक ३२ इंच स्मार्ट टीव्ही लाँच केला असून हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त टीव्ही असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

या कंपनीने टुफ्फेन ग्लाससोबत स्मार्ट टीव्ही लाँच केला असून ३२ इंच असलेल्या या टीव्हीची किंमत फक्त ५ हजार ४९९ रुपये इतकी असल्याचं कंपनीचं म्हणनं आहे. हा टीव्ही अँड्रॉयडवर चालणार असल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे.त्यामुळे जर तुमचा टीव्ही खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी हि आनंदाची बातमी आहे.

दरम्यान या टीव्हीची विक्री करण्यासाठी सामी कंपनीने एक अनोखी आयडिया वापरली आहे. सामी कंपनीची वेबसाईड ओपन केल्यानंतर तुम्ही थेट कंपनीच्या अॅपवर जाता. हि टीव्ही खरेदी करण्यासाठी तुम्हला हे अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. हे अॅप डाउनलोड करताना तुम्हला तुमचा आधार कार्ड नंबर टाकणे अनिवार्य आहे. तुम्ही आधार नंबर टाकला तरच तुम्हला हा टीव्ही खरेदी करता येणार आहे.

“टीव्ही स्वस्तात विकला जाणार असला तरी कंपनीला टीव्हीतून दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातीतून पैसे मिळणार आहेत. कारण, टीव्ही सुरू केल्यानंतर ग्राहकांना जाहिराती दाखवल्या जाणार आहेत. परंतु, या जाहिराती ग्राहकांना नको असल्यास त्यांना त्या हटवण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. टीव्ही खरेदी करताना भरलेली माहिती पडताळून पाहिल्यानंतरच टीव्ही खरेदी करता येणार आहे. अशी माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.