दै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन

पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते प्रकाशित

मराठी भाषेला असलेल्या 110 वर्षांच्या दीपावली अंकांच्या परंपरेला साजेसा असा “दै. प्रभातचा दीपोत्सव-2019′ हा दिवाळी अंक बुधवार, दि. 23 ऑक्‍टोबर रोजी, पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते प्रकाशित झाला. यावेळी दिशा ऍडव्हर्टायजर्सचे रवी देशमुख, दै. प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, कार्यकारी संपादक अविनाश भट आणि दै. प्रभातचे विभागप्रमुख कर्मचारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन श्रीनिवास वारुंजीकर यांनी केले. अविनाश भट यांनी प्रास्तविक करताना दिवाळी अंकांच्या परंपरेपिषयी माहिती दिली. रवी देशमुख यांनी सर्वांगसुंदर दिवाळी अंकाला शुभेच्छा दिल्या. बी. एल. स्वामी यांनी अंकामधील कथा आणि साहित्याविषयी विवेचन केले. तर मुक्ताताई टिळक यांनी दिवाळी अंकांविषयीच्या लहानपणीच्या आठवणी जागवताना सांगितले की, मराठीला असलेली दिवाळी अंकांची परंपरा “प्रभात’प्रमाणे सर्वांनी जोपासणे गरजेचे आहे. तसेच दर्जेदार लेखन आणि नवे लेखक घडण्यासाठी प्रसंगी विशेष कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.