नगर -ग्रामीण भागाचा राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा पुढील महिन्यात उडणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतची घोषणा मंगळवारी केली. यात ग्रामपंचायत सदस्यपदांच्या, तसेच सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होईल.
जिल्ह्यातील 194 ग्रामपंचातीसह 82 ठिकाणी पोट निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबर मतदान होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. निवडणूका जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात मंगळवार (दि.3)पासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत दाखल करावे लागणार आहे. दाखल अर्ज छानणी 23 ऑक्टोबर रोजी, नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येईल. त्याच दिवशी चिन्हांचे वाटप होईल. दि. 5 नोव्हेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होऊनदि. 6 रोजी मतमोजणी व निकाल असा कार्यक्रम आहे.
या गावात होणार निवडणूक
अकोले – कोंभाळणे, पैठण, जहागिरदारवाडी, बारी, सांम्रद, रतनवाडी, मुतखेल, शिसवद, पाचनई, अंबित, पेंडशेत, वाजुळशेत, रेडे, सुगाव बु., गर्दणी, कौठवाडी, पिंपळगाव नाकविंदा, आंबेवगंन, देवगाव, एकदरे, कोकणवाडी, तिरडे, पाचपट्टावाडी, घोटी, पेढेवाडी, पिंपळदरावाडी, खानापूर-आगार संगमनेर – गुंजाळवाडी, ढोलेवाडी, आश्वी खु, आश्वी बु., बोरबन, घारगाव, पिंपळगाव कोझिरा कोपरगाव – कुंभारी, घोयेगाव, ब्राम्हणगाव, वारी, जवळके, धोत्रे, बोलकी, सुरेगाव, लौकी, मुर्शतपूर, चांदगव्हाण, दहीगाव बोलका, कारवाडी, पोहेगाव, शहाजापूर, मंजूर, कान्हेगाव. राहाता – दहेगाव कोर्हाळे, कोर्हाळे, निमगाव कोर्हाळे, धनगरवाडी, दुर्गापूर, वाकडी, दाढ बु., पिंपरी निर्मळ, कनकुरी, रुई, पुणतांबा-रस्तापूर, चितळी.
श्रीरामपूर – उंदिरगाव, शिरसगाव, उक्कलगाव, निमगाव खैरी, भोकर, फत्ताबाद, खिर्डी, कान्हेगाव, गुजरवाडी, माळवडगाव, दत्तनगर, भैरवनाथ नगर, जाफ्राबाद, नाऊर, दिघी, रामपूर, कडीत बु. राहुरी – कानडगाव, चिंचोली, पिंपरी वळण, निंभेरे, सडे, डिग्रस, शिलेगाव, दरडगावथडी, मोमीन आखाडा, घोरपडवाडी, धामोरी खु. धामोरी बु., म्हैसगाव, देसवंडी, तमनर आखाडा, गंगापूर, बारागाव नांदूर, ब्राम्हणी, मुसळवाडी, टाकळीमियॉं. नेवासा – करजगाव, पानेगाव, देडगाव, पाचेगाव, फत्तेपूर, रस्तापूर, कौठा, शहापूर, पिचडगाव, भानसहिवरा, खुणेगाव, नागापूर, जैनपूर, सौंदळा, पानसवाडी, मुकींदपूर. शेवगाव –
हिंगणगावने, देवटाकळी, शहरटाकळी, बालमटाकळी, ढोरसडे अंत्रे, मुंगी, कर्हे टाकळी, खरडगाव, थाटे, बोधेगाव, वडुले खु., वरूर बु., भगूर, लोळेगाव, सामनगाव, एरंडगाव भागवत, लाखेफळ, एरंडगाव समसुद, वडुले बु., खडके, मडके, लाडजळगाव, आव्हाणे बु., बर्हाणपूर, दिवटे, शेकटे खु, गोळेगाव. पाथर्डी – ढवळेवाडी, सैदापूर, हत्राळ, डमाळवाडी, जवखेड खालासा कासारवाडी, धारवाडी, गितेवाडी, पाडळी, दगडवाडी, डांगेवाडी, साकेगाव, रेणुकाई वाडी, डोंगरवाडी, चिचोंडी, करंजी जामखेड – मुंजेवाडी, मतेवाडी, जवळा. कर्जत- कुंभेफळ, वायसेवाडी, खेड, गणेशवाडी, औटेवाडी, करमनवाडी श्रीगोंदा – विसापूर, अधोरेवाडी, पेडगाव, आनंदवाडी, कोळगाव, देवदैठण, मढेवडगाव, टाकळी लोणार, लोणी व्यंकनाथ, घुटेवाडी. पारनेर – विरवली, यादव वाडी, मावळेवाडी, काकनेवाडी, वाडेगव्हाण, कान्हूरपठार, जामगाव, निंबोडी. नगर – बारदरी, मेहेकरी, हिवरेझरे, आरणगाव, देऊळगाव सिध्दी, हिंगणगाव, वडगाव गुप्ता.