राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 17 आमदार आमच्या संपर्कात

रावसाहेब दानवे यांचा गौप्यस्फोट

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकापाठोपाठ एक धक्‍के बसत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे 17 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

विधानसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्याआधीच भाजपने विरोधी पक्षातील आमदार आपल्या पक्षात घेण्यासाठी जोरदार बॅटिंग सुरू आहे. आता पुन्हा राष्ट्रवादीचे 17 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसेच, कॉंग्रेसचे दिग्गज नेतेदेखील भाजपत प्रवेशासाठी रांगा लावून उभे आहेत. मात्र, सामाजिक समीकरण व राजकीय परिस्थिती विचारात घेऊन त्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे दानवे म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.