पूरग्रस्त विद्यार्थ्यांना गणवेश सक्ती नको 

पुणे  – राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पूरग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती करू नये, असे आदेश शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी प्राथमिक, माध्यमिक शिक्षण संचालकांना बजाविले आहेत.

अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे महापुराचा सामना नागरिकांना करावा लागला आहे. महापुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे. घरात पाणी शिरल्यामुळे दैनंदिन जीवनावश्‍यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.

विद्याथ्यांचे शालेय साहित्य खराब झाल्याच्या गंभीर समस्याही निर्माण झाल्या आहेत. पूरपरिस्थितीमुळे नागरिकांवर इतरत्र सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. पूरामुळे शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती करू नये, असे आदेशात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.