दुबई – सॅम कुरेन, शेन वॉटसन, अंबाती रायडू, कर्णधार महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 6 बाद 167 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली.
Innings Break!
After opting to bat first, #CSK post a total of 167/6. Will it be enough to defend or will #SRH chase this down?#Dream11IPL #SRHvCSK pic.twitter.com/cTBT9mHLHg
— IndianPremierLeague (@IPL) October 13, 2020
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निर्णयाला संमिश्र यश मिळाले. सलामीवीर फाफ डुप्लेसीला पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला. फाफ डुप्लेसी शून्यावर बाद झाला. त्यानंतर सॅम कुरेन 31(21), शेन वॅाटसन 42(38), अंबाती रायडू 41(34) आणि एमएस धोनीने 21(13) धावा करत महत्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर रवींद्र जडेजाने केवळ 10 चेंडूत नाबाद 25 धावांची खेळी केली व चेन्नईला 6 बाद 167 अशी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.
हैदराबादकडून गोलंदाजीत संदीप शर्मा, खलील अहमद आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 6 बाद 167 धावा. (सॅम कुरेन 31, अंबाती रायडू 41, शेन वॉटसन 42, महेंद्रसिंग धोनी 21, रवींद्र जडेजा नाबाद 25, दीपक चहर नाबाद 2, संदीप शर्मा 2-19, टी. नटराजन 2-41, खलील अहमद 2-45).